4595724


 
   

Terms and Conditions

पोलिस डायरी न्यूज पोर्टल च्या वार्ताहारांकरिता असलेल्या अटी आणि शर्ती :-

आपण या पोर्टल वर बातमी सादर करन्यासाठी स्वतःहून आवेदन केले होते, त्यानुसार आपण प्रतिनिधी या पदाकरिता सोबतच्या कागदपत्रांसह अर्ज सादर केला आहे. त्या अनुषंगाने आपल्या अर्जाचा प्रतिनिधी या पदा करिता विचार करण्यात आला आहे. करिता आपली नियुक्ती ११ महिन्यांच्या कालावधी करिता खालील नमूद अटी आणि शर्ती च्या अधीन राहून करण्यात आलेली आहे.

 • 1.आपली नेमणूक हि केवळ ११ महिन्यांच्या कालावधीकरिता असेल. या नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर आपण पुन्हा नव्याने नोंदणी करून शकता.

  2.आपली नेमणूक हि केवळ कमिशन तत्वावर करण्यात आली आहे.

  3.तुमच्याद्वारे येणाऱ्या जाहिरातीकरिता तुम्हाला ४०% पर्यंत कमिशन आणि १०% पर्यंत परफॉर्ममन्स बोनस नियम अटीच्या अधीन राहून मिळू शकतो.

  4.पोर्टल च्या कार्यालयाद्वारे देण्यात येणाऱ्या ओळखपत्र, विजिटिंग कार्ड आणि तत्सम वस्तूंचा दुरुपयोग करणार नाही. तसे आढळून आल्यास तुम्ही कार्यवाही होण्यास पात्र असाल.

  5.नियुक्तीच्या कालावधी दरम्यान कोणत्याही प्रकारे खोट्या बातम्या ,दृश्य चित्रफितीद्वारे, अवमान करणारे मजकूर, छायाचित्र किवा चित्रफिती तसेच इतरचे बदनामीकारक खोटे वृत्त प्रकाशित करण्यास एखाद्या व्यक्तीस दुखावण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यासाठी पाठवेल, तो स्वतः होणाऱ्या कार्यवाहीस पात्र असेल. त्या खोट्या वृत्ताशी पोलिस डायरी न्यूज पोर्टल (प्रबोधिनी मीडिया अँड इंटरप्राईजेस लिमिटेड) चा काहीही संबंध आणि जबाबदारी राहणार नाही.

  6.नियुक्तीच्या काळात खोट्या आणि जाणीवपूर्वक लावण्यात येणाऱ्या बातम्यामुळे कोणत्याही व्यक्तीची मानहानी होणार नाही याची पुरेपूर काळजी संबंधित वार्ताहाराने घ्यायची आहे.तसे झाल्यास त्याबाबत संपूर्ण जबाबदारी हि वार्ताहाराची असेल.

  7.खऱ्या बातम्या लावण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल, आणि पोलिस डायरी (प्रबोधिनी मीडिया अँड इंटरप्राईजेस लिमिटेड) कठीण प्रसंगी तुमच्या समर्थनार्थ तुमच्या सोबत असेल.

  8.नियुक्तीच्या कालावधी दरम्यान असे कोणतेही लेखन करू नये जे न्यायालयाचे अवमान करणारे असेल. तसे केल्यास त्याची पूर्ण जबाबदारी हि त्या संबंधित वार्ताहराची असेल.

  9.नियुक्तीच्या काळात असे कोणतेही वर्तन, कृत्य, चित्रफित करणार नाही ज्यामुळे पोलिस डायरी(प्रबोधिनी मीडिया अँड इंटरप्राईजेस लिमिटेड)  च्या नावास, लौकिकास बाधा निर्माण होणार नाही. तसे केल्यास होणाऱ्या कार्यवाहीस अर्जदार वार्ताहर स्वतः जबाबदार असेल.

  10.नियुक्तीदरम्यान कोणत्याही गटाच्या, समूहाच्या भावनांना उत्तेजन, किवा बाधा, चिथावणी देऊन आणीबाणीची स्थिती उद्भवेल असे वर्तन, कृत्य होणार नाही.

  11.नियुक्तीच्या काळात जनतेतील धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, नैतिक, मानसिक भावना दुखावले जातील असे कोणतेही कृत्य करता येणार नाही.

  12.नियुक्ती दरम्यान देशाच्या सार्वजनिक हितास बाधा पोचेल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत.

  13.जर तुमच्या मतांमुळे पोलिस डायरी(प्रबोधिनी मीडिया अँड इंटरप्राईजेस लिमिटेड)  च्या मालमत्तेस, लौकिकास कुठलेही नुकसान, किवा हानी, बाधा पोचल्यास त्याची नुकसान भरपाई तुमच्या कडून वसूल करण्यात येईल.

  14.बातमी देताना केंद्र शासन आणि राज्य शासन यांचेद्वारे करण्यात आलेल्या कायदा, अधिनियम, नियम यांचे उल्लंघन होणार नाही याची देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.

  15.निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची तंतोतंत काळजी घ्यावी.

  16.बातम्या तयार करताना नियमाप्रमाणे नावाची गोपनीयता ठेवण्याबाबतची सर्व काळजी घेतली गेली पाहिजे.

  17.बातमी तयार करताना नैसर्गिक न्याय तत्वाचं उलंघन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी. बातमी लावताना दोन्ही बाजूंचे म्हणणे लावणे बंधनकारक असेल.

  18.कोणत्याही कृत्याद्वारे प्रसिद्धी माध्यमांच्या(पोलिस डायरी च्या) हितास बाधा पोचणार नाही याची काळजी घ्यावी.

  19.बातमी लावताना बातमीतील सत्यता पूर्णपणे पडताळून झाल्यानंतरच बातमी पाठवावी. आवश्यकता भासल्यास त्यासंदर्भातील पुरावे देखील सोबत सलग्न करून पाठवावीत.

  20.एखाद्या प्रसंगी पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद झाल्यानंतरच त्या घटनेबाबतची बातमी घेण्यात यावी. एफ. आय.आर. मधील सर्व तपशील details सहित बातमी करावी.

  21.पोलीस डायरी तर्फे वेळोवेळी घेण्यात येणारे सर्व निर्णय नियुक्त प्रतिनिधीस मान्य असतील.

  22.नियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी जर कोणत्याही कारणासाठी मधेच सोडण्याची, किवा करार संपुष्टात आणण्याची वेळ उद्भवल्यास तशी दोन महिने पूर्वी लेखी नोटीसीद्वारे कळवणे बंधनकारक असेल, तसेच देण्यात आलेले साहित्य पोलिस डायरी कार्यालयात जमा करण्यात यावे.

  २३. प्रतिनिधींना दिलेल्या वस्तूंचा    मेंबरशीप चा काहीही संबंध राहणार नाही .

  24. ज्या प्रतिनिधींचे आर्थिक व्यवहार अर्धवट असेल ,अशा प्रतिनिधीने अर्धवट काम सोडल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याची जबाबदारी प्रतिनिधीची असेल.  

  25. पोर्टल वर जाहिरातीसाठी २९ दिवसाचा कालावधी प्रतिनिधीला देण्यात येईल.

  26.  प्रतिनिधीला रोज बातम्या महिन्यात  कमीतकमी १०,००० रुपयाचा टारगेट पूर्ण करणे अनिवार्य आहे . 

  27.जाहिरातीची रक्कम रोख स्वरुपात घ्यायचे नाहीत, सर्व जाहिरातीचा व्यवहार हा मेसर्स- “प्रबोधिनी मीडिया अँड एंटरप्राईजेस लिमिटेड याच नावाने करण्यात येतील. आणि प्रतिनिधीनचे कमिशन ची रक्कम देखील चेक द्वारेच अदा करण्यात येईल.

  28.जाहिराती संदर्भात होणाऱ्या रोख व्यवहारांना पोलीस डायरी पोर्टल (प्रबोधिनी मीडिया अँड एंटरप्राईजेस लिमिटेड)  प्रशासन जबाबदार राहणार नाही.

  29.प्रत्येक प्रतिनिधीस बातम्या पाठवण्यासाठी स्वतंत्र लॉगीन आय. डी. आणि पासवर्ड देण्यात येईल. त्यातूनच येणाऱ्या बातम्याना प्रसिद्ध करण्यात येईल.

  30.प्रतीनिधीन्द्वारे नोंदणी करते वेळी देण्यात आलेली नोंदणी फी ची रक्कम हि परत मिळणार नाही, तसेच ती हस्तांतरीत होणार नाही.

  31.पोलिस डायरी(प्रबोधिनी मीडिया अँड इंटरप्राईजेस लिमिटेड)  तर्फे सर्व प्रतिनिधीना त्यांच्या नियुक्ती आणि पदानुसार निश्चित केलेले पोलीस डायरी किट नोंदणी नंतर हस्तांतरित करण्यात येईल.

  32.प्रिंट पोलिस डायरी(प्रोजेक्ट) चा वार्षिक अंकाची जबाबदारी प्रत्येक जिल्हा प्रतिनिधीला देण्यात येईल.

  33.प्रिंट पोलिस डायरीच्या (प्रोजेक्ट) वार्षिक अंकाचे कमिशन वेगळ्याने ४० % पर्यंत तसेच परफॉर्ममन्स बोनस १० %  देण्यात येईल.

  34. वार्ताहर कडून आलेल्या बातम्या फक्त पोर्टलवरून सरकुलेशन काम पोलीस डायरी न्यूज पोर्टल(प्रबोधिनी मीडिया अँड इंटरप्राईजेस लिमिटेड) आहे . आणि त्या  बातमीच्या मजकुराची  जबाबदारी  प्रतिनिधींची  राहणार. 

  35.लोकसंख्येच्या सुमारे २०% तुमच्या शहरातील घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप साठी मेंबर बनविणे बंधनकारक राहील. 

    I accept the terms & conditions